चार जनावरांचा आगीत होळपळून जागीच मृत्यू तर एक जनावर गंभीर जखमी
नंदू झोडे वरोरा :- तालुक्यातील कोंढाळा या गावातील रवींद्र ऋषींजी आहिरकर वय 43 या युवा शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या गोठ्याला आग लावून काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी चार जनावरांना ठार करून एकाला गंभीर जखमी केल्याचा खळबळजनक प्रकार घडल्याने या परिसरात संताप व्यक्त होत आहे.
रवींद्र ऋषींजी अहिरकर यांचे शेत कोंढाळा शिवारात गावापासून जवळपास अडीच किलोमीटर दूर असून तिथे तीन गाई व दोन बैल होते सोबतच जवळपास 10 क्विंटल कापूस व इतर शेतीची औजरे गोठ्यात होती ते सर्व जळून खाक झाले असून ही आग नेमकि कुणी लावली याचा शोध पोलिसांनी घ्यावा, त्या विघ्नसंतोषी व्यक्तींना अटक करावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.