राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजीव कक्कड यांच्या तक्रारीवरून चौकशी
चंद्रपूर (प्रतिनिधी) : मालमत्तेचे मुल्याकन जास्तीचे दाखविवुन कर्ज वाटप करणाÚया स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या 3 अधिकाÚयासह 15 जणाना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंद्रपूर शहराध्यक्ष राजीव कक्कड यांनी दोन वर्षापुर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कडे तक्रार दाखल केली होती, सदर तक्रारीवरून चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे.
सदर प्रकरणात बनावट आयकर रिटर्न तयार करून आणि मालमत्तेचे जास्त मुल्याकन दाखवुन 44 प्रकरणामध्ये सुमारे 14 कोटी 26 लाख 61 हजार 700 रूपयाचे कर्ज स्टेट बॅंक ऑफ इंडीया कडन वाटप केल्याचे उघड झाले आहे, चंद्रपूरच्या आर्थीक गुन्हे शाखेने सदर कारवाई केली असुन शाखा व्यवस्थापक देविदास कुलकर्णी, कर्ज प्रक्रिया अधिकारी विनोद लोटलवार, पंकजसिंह सोलंकी यांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच गणेश नैताम या एजंटसह 11 मालमत्ताधारकांनाही अटक करण्यात आली आहे.
कर्जदार हे अतिशय गरीब घरातील व्यक्ती असुन त्यांच्या नांवाने मोठया प्रॉपर्टी डिलर्सनी कर्जाची रक्कम हडप केल्याची शंका वर्तविली जात आहे. यामुळे सदर प्रकरणात बॅंकेचे काही अधिकारी आणि काही प्रॉपर्टी डिलर्सना सुध्दा अटक करण्याची शक्यता आहे. सदर कारवाईमुळे चंद्रपूरच्या प्रॉपर्टी डिलर्स मध्ये खळबळ उडाली आहे.