मुल प्रतिनिधी:- आज दिनांक 28/02/2022 रोजी तहसिल कार्यालया,मूल येथे राकेश या. रत्नावार अध्यक्ष,संजय गांधी निराधार योजना समिती यांचे अध्यक्षतेखाली लाभार्थ्याचे प्रकरणे मंजूर करण्याकरिता सभा आयोजित करण्यांत येऊन श्रावणबाळ योजना -108,वृध्दपकाळ योजना-43, संजयगांधी निराधार योजना-20असे एकूण 171 प्रकरणे मंजूर करण्यांत आले.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेचे अर्ज प्रलंबित राहणार नाही याद्ष्टीने समितीची नियमीत सभा घेवून अर्ज मंजूर करण्यांचा पूर्णपणे प्रयत्न करित असून यापुर्वी समितीने दिलेला शब्द पाळीत आहे.
तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री.राकेश या.रत्नावार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्यांचे दृष्टीने प्रयत्नशिल असून केसेस प्रलंबीत राहणार नाही यादृष्टीने प्रयत्न करण्यांत येत आहे. अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या केसेसचा निपटारा करण्यांत आलेले असून चालू अर्ज सुध्दा दरमहा मिटींग आयोजित करण्यांत येऊन मंजूर करण्यांत येत आहे. सदर योजने संबंधाने कांही अडचणी असल्यास तहसिल कार्यालयाचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करण्यांत यावी. व दलालापासून सावधान राहावे.याऊपरही काही अडचण असल्यास संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचेशी संपर्क साधावा.
शासनाकडून अनुदान मिळण्यांस विलंब होत असल्यामूळे निधी उपलब्धतेसाठी समिती पाठपुरावा करीत असून अनुदान प्राप्त होताच तात्काळ लाभार्थ्यांचे खात्यात रक्कम जमा करण्यांत येईल तरी लाभार्थ्यांनी गैरसमज करू नये असे आव्हान करण्यांत येत आहे.
तरी सदर सभेला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, मा.राकेश या.रत्नावार, मा.ठाकरे साहेब,नायब तहसिलदार, तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य,श्री.दशरथ वाकुडकर, श्री.संजय गेडाम,सौ.अर्चना चावरे, श्री.सोनल मडावी, श्री.सत्यनारायण अमदुर्तीवार व संजय गांधी निराधार योजनेचे संबंधित कर्मचारी श्री.गिरडकर उपस्थित होते.