भाजपात भांडण लावणारा तो स्वयंभु युवा नेता कोण?

तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी !

धनराज रामटेके मूल : कुटुंबातील व्यक्ती भाजपाची लोकप्रतिनिधी असल्याच्या फायदा घेत स्वतःला भाजपाचा स्वयंभु नेता समजुन तालुक्यातील एका जेष्ठ लोकप्रतिधीच्या मागे मागे फिरून ठेकेदारी करून भाजपामध्येच भांडण लावणारा तो स्वयंभु युवा नेता कोण? असा सवाल मूल येथे चर्चेचा विषय ठरत आहे.

मूल नगर पालीकेत भाजपाची सत्ता होती दरम्यानच्या काळात हयाच स्वयंभु युवा नेत्यानी नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकाप्रती बदनामीकारक वृत्त सोशल मिडीयावर टाकुन बदनामी केली होती, मात्र त्यांकडे भाजपाच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले, सध्या तो जिल्हातील एका उच्च पदावर काम करनाऱ्या लोकप्रतिनिधीच्या मागे फिरून कामांची ‘‘सेटिंग’’ करण्यासाठी दिवसरात्र फिरताना दिसत आहे,

मूल शहर भाजपाच्या युवक अध्यक्षपदासाठी आपल्याच नावाची वर्णी लागावी यासाठी अलीकडेच समाजबांधवाना पुढे करून धडपळ करण्यातही तो आघाडीवर होता, मात्र आपली दाळ काही  शिजणार नाही हे लक्षात येताच त्यांने मूल येथील भाजपाच्या काही जेष्ठ कार्यकर्त्यांना आपल्या नावाची शिफारस करण्यासाठी मनधरर्णी करीत होता.
विकासपुरूष राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली एकसंघ असलेला भाजपा अशा उपऱ्या स्वयंघोषीत युवा नेत्याुळे भविष्यात तालुका भाजपामध्ये गटबाजी तर होणार नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, तथा भाजपाच्या तालुकाध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्या नेतृत्वात भाजपाचे संध्यातरी चांगले काम सुरू आहे, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह अनेक ग्राम पंचायत मध्ये भाजपाची सत्ता आहे, मात्र अशा स्वयंभु युवा नेत्यामुळे भाजपातील काही जेष्ठ कार्यकर्त्यामध्येच भांडण होत असल्याची चर्चा आहे, केवळ कामांचे कंत्राट मिळावे यासाठी सदर स्वयंभु युवा नेत्याची जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या छत्रछायेत भाजपातील लुडबुड वाढल्याचे दिसुन येत आहे, जिल्हा परिषदेच्या अनेक कामांमध्ये हयाच्याच माध्यमातुन अनेक कामांची सेटिंग होत असल्याची चर्चा आहे, यामुळेच तालुक्यातील अनेक युवा कंत्राटदारही त्यांच्याच संपर्कात राहुन कामांची हेराफेरी करीत असल्याची चर्चा तालुक्यात असुन अशा कामांमुळेच भाजपातील एकनिष्ठ कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.

भाजपातील काही लोकप्रतिनिधी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलुन समाज आणि उपऱ्या कार्यकर्त्यांना मोठया प्रमाणात महत्व देत असल्यामुळेच भाजपाचा पाया ढिसुळ होत असल्याची चिंता ग्रामीण भागातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.