नागरिकांना होतोय नाहक त्रास : आळा घालण्याची नागरिकांची मागणी
प्रमोद मेश्राम चिमूर :- चिमूर तालुक्यातील बाम्हणी व परिसरातील गावांमध्ये अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. यामुळे या गावांमध्ये दारूचा महापूर आला असून खुलेआम दारूविक्री होत असूनही प्रशासणाचे दुर्लक्ष होत असल्याने गावकर्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
अवैध दारूविक्रीमुळे गावात अनेकांची कुटूंब उदध्वस्त होत असून युवकही दारूच्या आहारी जात आहेत.राजरोस खुलेआम चालणार्या दारू व्यवसायामुळे अनेक कुटुंब उदध्वस्त होत चालले आहेत.
चिमूर तालुक्यात बऱ्याच गावात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात व्यवसाय करून विक्री केली जात आहे. रात्री-बेरात्री दारू अड्डे सुरू राहत असल्याने याकडे कुणी फिरकुन पाहत नाही. मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू गाळून खुलेआम विक्री होत असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे परिसरातील युवक दारूच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. तर गावा-गावातील शांतता धोक्यात आली आहे.
अवैध दारूविक्रेत्यांवर लगाम कोण लावणार, असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत. या सर्व प्रकाराकडे लक्ष देवून पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कार्वाही करावी, अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.