पोलीस पाटलांच्या विविध मागण्याचे महसूल मंत्र्यांना निवेदन

अतुल कोल्हे भद्रावती :
राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध समस्या असून त्या शासन दरबारी प्रलंबित आहे या मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्या यासाठी पोलीस पाटील जिल्हा अध्यक्ष योगेश मत्ते यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळांनी चंद्रपूर येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निवेदन दिले.

पोलीस पाटील हे पद शासन यंत्रणेतील पातळीवरील शासनाचा अत्यंत जवळचा घटक म्हणून ओळखला जातो इतिहास काळापासून चालत आलेल्या पोलीस पाटील हे पद ग्राम पोलीस अधिनियम १९६७ नुसार अस्तित्वात आले आहे . त्यामुळे ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्त करण्यात यावी व खालील प्रमाणे असलेल्या मागण्या पोलीस पाटलाचे दरमहा मानधन १५ हजार करावे , सेवानिवृत्ती नंतर योजना लागू करावी, पोलीस पाटलाचे नूतनीकरण बंद करण्यात यावे, कोराना काळामध्ये मृत्युमुखी पडलेल्या विमा संरक्षण रक्कम देण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्यात पोलीस पाटील भवन उपलब्ध करून द्यावे इत्यादी अशा दहा मागण्याचे निवेदन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थीतित देण्यात आले यावेळी पोलीस पाटील जिल्हा अध्यक्ष योगेश मत्ते, दीपक शंभरकर, श्रीहरी कुबडे, देकबाबा परसे , रवींद्र बोरकर आदी उपस्थित होते.