अतुल कोल्हे भद्रावती
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जेष्ठ कवि वि. वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज ह्यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन महाविद्यालयात साजरा करन्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ अजय दहेगावकर प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ एन ए स वाढवे तसेच प्रा डॉ एम एन खादरी व प्रा डॉ गजेंद्र बेदरे ह्या च्या उपस्थीतीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणातून प्रा डॉ एम एन खादरी यांनी मराठी भाषेचे महत्व सांगून कार्यक्रम आयोजन करण्यामागील भूमिका विशद केली.
प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ एन एस वाढवे यांनी मराठी भाषेचे महत्व व कवी कुसुमाग्रज यांच्या कार्याविषयी माहिती दिली आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा डॉ दहेगावकर यांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार कसा करायचासोबतच मराठी भाषेकडे होत जाणारे दुर्लक्ष यावर सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ गजेंद्र बेदरे यांनी केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम कोविड १९ च्या नियमांचे पालन करून घेण्यात आला.