विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले क्रीष्णा आणि बजरंगी ट्रॅव्हल्स मालक

मुल प्रतिनिधी:-आज राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या वेळापत्रकानुसार सकाळी नऊ वाजता होणाऱ्या परीक्षेसाठी मूल तालुक्यातील विद्यार्थ्यांना वेळेत पोहचता यावे म्हणून तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रॅव्हल्स मालकांना सकाळी गाड्या उपलब्ध करून देण्याचे आव्हान केले .त्याला प्रतिसाद देत क्रीष्णा आणि बजरंगी ट्रॅव्हल्स मालकांनी 7.00 वाजता ट्रॅव्हल्स उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे महामंडळाची परिवहन सेवा पूर्णपणे डबघाईस आली आहे. याचा सर्वसामान्य नागरिकासोबत विद्यार्थ्यांना खूप मोठा फटका बसत आहे.त्यामुळे चंद्रपूर येथे वेगवेगळ्या केंद्रावर सकाळी ९.०० वाजे होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या परिक्षेकरिता मुलं तालुक्यातील विद्यार्थ्यांना वेळेत पोहचता यावे त्यांना प्रवासात गैरसोय होऊ नये ही विधायक भावना ठेऊन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे यांनी सोशल मीडियावर ट्रॅव्हल्स मालकांना गाड्या उपलब्ध करण्याचे आव्हान केले .त्याला तात्काळ प्रतिसाद देत क्रीष्णा ट्रॅव्हल्स चे मालक मार्कंड कापगते आणि बजरंगी ट्रॅव्हल्स मालक काजू खोब्रागडे यांनी सकाळी ७.०० वाजता मूल ट्रॅव्हल्स स्टॉप वरून चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मोफत ट्रॅव्हल्स उपलब्ध करून दिली .

या कार्याचा समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक केल्या जात असून पत्रकार संघाच्या समयसूचकतेचा सुद्धा यावेळी आवर्जून कौतुक केल्या जात आहे.

दे धक्का एक्सप्रेस टिम च्या वतीने विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता शुभेच्छा !