महाशिवरात्रीला होणार सातबहिनी पेरजागड डोंगराची जत्रा

महाशिवरात्री निमित्ताने पेरजागड येथे 2 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रमोद मेश्राम चिमूर:- नागभीड – तळोधी बाळापूर परिसरातील पेरजागड सात बहिणी डोंगर एक धार्मिक स्थळ मानले जाते. महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी येथे दोन दिवसांची यात्रा भरते. शिवरात्रीच्या दिवशी यात्रेत डोंगरावर वसलेल्या महादेव मंदिरात पूजा केली जाते.

भाविक मोठ्या संख्येने येतात आणि दुसऱ्या दिवशी स्थानिक परिसरातील ग्रामस्थांद्वारे महाप्रसादाचे आयोजन केले जाते; मागील दोन वर्षी पासून कोरोनाच्या खबरदारीच्या कारणामुळे पोलीस विभागाने यात्रेला परवानगी दिली नव्हती.मात्र या वेळी महाशिवरात्रीला ला दिं 1 मार्च ते 2 मार्च पर्यंत या वेळी परंपरा खंडित होणारी यात्रा व वेळीस भरणात आहे.या ठिकाणी हजारो भाविक येथेत आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात प्रार्थना करून गावाला निघून जातात.

महाशिवरात्री जत्रेच्या निमित्ताने आकाश झेप फाउंडेशन रामटेक च्या वतीने 2 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पेरजागड सात बहिणी देवस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.तरी परिसरातील रक्तदान शिबिरात भाग घ्यावा असे आव्हान कमेटो द्वारे करण्यात आले आहे.

हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे.तळोधी बाळापूर वनक्षेत्रांतर्गत येणारा पेरजागड सात बहिणी डोंगर ताडोबा अभयारण्याला लागूनच असून, नवीन घोषित घोडाझरी अभयारण्याच्या मुख्य कोअर भागात पडतो, हा परिसर सारंगड बीटमध्ये येत आहे. वन्यजीवन येथे मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राण्यांचे प्रमाण बरेच आहे. ज्यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल यासारखे मोठे प्राणी सदैव फिरत असतात आणि या दगडी टेकडी पण आहे,तरुण दुचाकी आणि कारने जंगलात येतात.