प्रमोद मेश्राम प्रतिनिधी चिमूर-चिमुर तालुक्यातील नेरीवरुन जवळच असलेल्या सिरपुर येथील तरुण शेतकरी उमाकांत कचरू निकोडे वय 35 वर्ष यांनी 17 फ्रेब्रू ला रात्रो च्या सुमारास स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली
सिरपूर येथील प्रतिष्ठित होतकरू तरुण शेतकरी म्हणून नावारूपाला आलेल्या उमाकांत कचरू निकोडे हे प्रसिद्ध होते त्यांचे वडील कचरुजी निकोडे हे नुकतेच सहा महीन्याअगोर हुंदयविकाराच्या झटक्याने निधन पावले होते यामुळे दुःखाचे डोंगर निकोडे परीवारावर कोसळले होते वडील जाण्याच्या दुखातुन सावरत नाही तर आता तरुण मुलाने केलेल्या आत्महत्या मुळे संपूर्ण कटूंब उध्वस्त झाले आहे .
म्रुतक उमाकांत हा रात्री दहा वाजता आपल्या घरुन निघुन गेल्याचे समजले रात्रभर शेधाशोध घेताच पहाटे च्या सुमारास सिरपुर शेतशीवारात स्वताच्या शेतात निंबा च्या झाडाला गळफास घेऊन असल्याचे आढळून आले घटनास्थळी गावातील नागरीकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली पोलीस पाटील मंगेश भानारकर सीरपुर यांनी चिमुर पोलीसांना माहिती दिली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोळ हे आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले वृत्त लिहेपर्यंत आत्महत्याचे कारण अद्याप कळु शकले नाही ऊमाकांत जाण्यामुळे त्यांच्या मागे पत्नी वृद्ध आई आणि 6 व 8 वर्षे वयाच्या दोन मुली आहेत उमाकांत यांनी एकाएकी दुर्दैवी निर्णय घेऊ जीवन यात्रा संपविल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.