मुल येथे विविध विकासकामांचे आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न 

दिलेल्या शब्दाला जागनारा लोकनेता

मुल प्रतिनिधी:- स्मार्ट सिटी कडे संपूर्ण वाटचाल करीत असलेल्या मुल शहरात विविध रोड नाल्या व विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच लोकलेखा समितीचे अध्यक्ष , माजी अर्थ नियोजन व वन मंत्री , आमदार श्रीयुत सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. मुल शहरात नाविन्यपूर्ण पाणीपुरवठा योजना, कर्मवीर मा सा कन्नमवार सभागृह, जलतरण तलाव, पंडित दीनदयाळ उपाध्याय इको पार्क, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, सावित्रीबाई फुले अभ्यासिका, व्यायामशाळा , विहिरगाव तलाव व वरटी बोळीचे खोलीकरण तथा सौन्दरीकरन, आंतरिक रस्ते नाल्यांचे बांधकाम सुधीर भाऊंनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून पूर्णत्वास आणत परत रस्ते व नाल्यांच्या बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले. सर्वच प्रभागातील भूमिपूजन करत विकास कामांना सुरवात करण्यात आली.

भूमिपूजन कार्यक्रमांमध्ये जनतेचा प्रचंड उत्साह दिसून येत होता, ढोल ताशांच्या निनादात, फुलांचा वर्षाव करत, पारंपारिक पद्धतीने औक्षवन करीत नागरिक आपल्या लाडक्या नेत्यांचे स्वागत करताना दिसले, अनेक नागरिक सुधीरभाऊंना आपल्या छोट्या मोठ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बोलताना उत्सुक दिसले,जि प चंद्रपूर च्या अध्यक्षा सौ संध्याताई गुरनुले, माजी जि प अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा भाजप चे अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी नगराध्यक्ष सौ रत्नमाला भोयर नामदेव डाहूले, मा न प उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, भाजप मुल शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, प स सभापती चंदू मगणुरवार,मा बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, चंद्रकांत आष्ट्नकर,अजय गोगुलवार, अनिल साखरकर, मिलींद खोब्रागडे, प्रशांत लाडवे, महेंद्र करकाड़े,विनोद सिडाम, संजय येरोजवार, राकेश ठाकरे , प्रशांत बोबाटे, दादाजी येरणे तसेच सर्व मा. नगरसेवक, नगरसेविका कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व भूमिपूजन आटोपत जाहीर सभेनी कार्यक्रमाची सांगता झाली. जाहीर सभेचे प्रास्ताविक अनिल साखरकर यांनी केले

उदघाटनिय भाषणात सुधीरभाऊनी संपूर्ण सांसदीय आयुधांचा वापर करीत या शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, आज जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने,प्रेमाने भारावून गेलो. अशे विधान केले. शहराच्या आजूबाजूला असलेल्या काँग्रेस शासित नगर पंचायत बघा, महाविकास आघाडी सरकार येऊन अडीच वर्षे होत आले पण त्यांचा झालेला विकास आणि मुल शहराची तुलना करा त्यांच्या आणि आमच्या कार्यातील फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल असेही विधान सुधीर भाऊंनी केले. सभेला जनतेची प्रचंड उपस्थिती होती. सभेचे आभार प्रदर्शन सचिन बोर्डावार यांनी केले. अनेक महिला, पुरुष, युवक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.