प्रमोद मेश्राम चिमूर:- तालुक्यातील भिसी येथील रहिवासी विनोद शंकर महाजन गुरुजी वय 48 वर्षे यांचे आज दुपारी साडेतीन वाजता च्या सुमारास उमरेड -नागपूर महामार्गावर उदासा या गावाजवळ ट्रक व कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे तर यामध्ये कार चालक तुरणकर वय 35 वर्षे उमरेड हा गंभीर जखमी झाल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृतक विनोद शंकर महाजन गुरुजी पंचायत समिती नागभिडअंतर्गत पेंढरी ( बरड़) ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होते ते उमरेड वरून नागपूरला जात असताना दुपारी साडेतीन वाजता चे सुमारास आईसर कंपनीचा ट्रक व सेलारीओ कंपनी ची कार यांच्यात उदासा या गावाजवळ समोरासमोर धडक होऊन विनोद महाराज घटनास्थळीच मरण पावले. उमरेड पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पंचनामा करून आयशर ट्रक चालकास अटक केलेली आहे. प़ेत उत्तरनीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय उमरेड येथे पाठविण्यात आलेले आहे. मृतक विनोद महाजन यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी आई भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पुढील तपास उमरेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहेत.