कर्नाटका एम्टा येथील नारायणा कंपनीचे काम बेकायदेशीर

कंपनीवर कारवाईसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

अतुल कोल्हे भद्रावती : 
कर्नाटक एम्टा कंपनीतील कोळसा उत्खनन व कोळसा वाहतुकीचे काम नारायणा कंपनीला मिळाले आहे मात्र या कंपनीने उत्खनन मशीनवर तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनावर बेकायदेशीर वाहन चालक व कामगार ठेवल्याने अशा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक कामगाराच्या वतीने प्रकल्पग्रस्त विशाल दुधे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे .
नारायणा कंपनी ला कर्नाटक एम्टा येथील कोळसा उत्खनन तसेच वाहतुकीचे काम मिळाले आहे. मात्र या कंपनीत स्थानिक कामगारांना डावलून परप्रांतीय व अल्पवयीन वाहन परवाना नसलेले चालक , पोलीस वेरिफिकेशन नसलेले कामगार रुजू केले आहे. तसेच या कामावर चालत असलेले वाहनावर नंबर नसून कालबाह्य झालेले वाहन या कामावर सुरू आहे. अशा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी पोलीस विभाग, आरटीओ, जिल्हाधिकाऱ्याकडे स्थानिक कामगारांच्या वतीने विशाल दुधे यांनी केली आहे.

कंपनीत झालेल्या प्रकाराबाबत  विचारणा केली असता कंपनीत काम करणारे कामगार हे पूर्वीपासूनच आमच्या कामावर रुजू करण्यात आले आहे. आता त्यांचे वारंवार पोलीस वेरिफिकेशन करणे शक्य नाही तसेच कंपनीवर लावलेले आरोप योग्य  नसल्याचे प्रोजेक्ट मॅनेजर चेतन कच्छावार यांनी सांगितले.