जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मदतीने मिळाला अनेकांना रोजगार

राजीव गांधी स्वावलंबन योजनेतुन युवकांना कर्ज उपलब्ध

मूल (प्रतिनिधी) : बेरोजगारांना रोजगार देण्याच्या दुष्टीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सुरू केलेल्या स्व. राजीव गांधी स्वावलंबन योजनेमुळे जिल्हातील अनेक तरूणानी स्वयंरोजगार सुरू केलेले आहे, सदर योजनेतुन मिळालेल्या कर्जामुळे अनेक युवक आज आपल्या कुटुंबासाठी आधार बनुन उभे आहेत यामुळे युवकांनी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे आभार मानले आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरू केलेल्या स्व. राजीव गांधी स्वावलंबन योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांना छोटे रोजगार उभारण्यासाठी कोणतेही तारण न घेता वैयक्तिक हमीवर अत्यंत सोप्या पद्धतीने पन्नास हजार रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देत असल्यामुळे बेरोजगार तरुणांना व्यवसाय निर्मितीसाठी मदत होत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिह रावत यांनी बँकेच्या अध्यक्ष पदाची कमान मिळाल्यानंतर अनेक लोकाभिमुख योजना अंमलात आणून त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरीकांना मिळावा यासाठी प्रयत्नरत आहेत, .बँकेच्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत कॅन्सर, हदयरोग सारख्या दुर्जर आजाराच्या रुग्णांना उपचारासाठी 30 ते 40 हजाराची मदत केली जात आहे. वन्यप्राण्याच्या हल्यात बैल ठार झालेल्या शेतकÚयांना तात्काळ 10 हजाराची आर्थिक मदत केली जात आहे, अशा अनेक योजना बँकेनी सुरू केल्या आहेत त्यापैकीच स्व. राजीव गांधी स्वावलंबन योजना ही जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना वरदान ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातुन अनेक तरुणांनी छोटे व्यवसाय उभारून कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या योजनेतून किराणा दुकान, भाजीपाला विक्री, केस कर्तनालय, चिकन मटण विक्री सेंटर, महिला ब्युटिक, ब्युटी पार्लर, टेलरिंग शॉप, फुटपाथवरील व्यवसाय, हातठेला, चहाचे दुकान, पानठेला व्यवसाय करीता कर्ज दिले जात असून जिल्ह्यातील शेकडो बेरोजगारांना या योजनेचा आधार मिळालेला आहे.. व्यवसाय करण्यासाठी बेरोजगार युवकाना स्व. राजीव गांधी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातुन विना तारण कर्ज उपलब्ध करून दिल्याबदल चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत याचे आभार मानल्या जात आहे.

विनातारण कर्जामुळेच रोजगार शक्य : पराग ताकसांडे
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे स्व. राजीव गांधी स्वावलंबन योजनेतु 50 हजार रूपयाचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता, बॅकेचे अध्यक्ष संतोषभाउ रावत यांच्या माध्यमातुन मला 50 हजार रूपयाचे कर्ज विनातारण मिळालेले आहे. यामुळे मी मूल तालुक्यातील जानाळा येथील मुख्य चौकात पानठेला व चायटपरी चा व्यवसाय करीत आहे, विनातारण कर्ज उपलब्ध झाल्यामुळेच माझे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास मदत होत आहे.