पोलिसांची जुगार अड्डयावर धाड

7 आरोपीला अटक

राजुरा (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानोरा परिसरात गस्त करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे विरूर पोलिसांनी धानोरा येथे धाड टाकून जुगार खेळनाऱ्या सात आरोपीना रंगेहात पकडून अटक केली आहे. आरोपीची झडती घेऊन एकूण दोन हजार नव्वद रुपये जप्त करण्यात आले.

जुगार खेळणारे किशोर सखाराम जुलमे (वय 47 ), राजू पांडुरंग गाव्हारे (वय वर्ष 33), भारत बाबुराव मेश्राम (वय वर्ष 35), रामदास महादेव मडावी (वय वर्ष 30), प्रभाकर विश्वनाथ मोरे ( वय वर्ष 40), अरविंद विठोबा दरवेकर (वय वर्ष 30), सुरज बंडू टेकाम (वय वर्ष 26) सर्व रा. धानोरा ता. राजुरा. जि. चंद्रपूर यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस हवालदार भुजंगराव कुळसंगे, सचिन थेरे, सुरेंद्र काळे, प्रमोद मिलमिले यांनी केली.