पाण्याच्या समस्येपासून सुटका : सरपंचांच्या पुढाकारातुन पाच बोरवेलचे भूमिपूजन व लोकार्पण

अटल मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून रोजगार हमीच्या कामावरील मजुरांना सकाळ – सायंकाळ जेवणाचे डब्बे

फिस्कुटी ग्रामपंचायतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम,

मूल (प्रतिनिधी) :: तालुक्यातील फिस्कुटी येथील युवा सरपंच नितीन गुरनुले यांच्या संकल्पनेतून गावातील नागरिकांना पाण्याचा त्रास लक्षात घेता, तब्बल पाच बोरवेलचे भूमिपूजन करून लोकार्पण करण्यात आले.

फिस्कुटी येथील  मांदाडे यांच्या घरासमोर (वार्ड नं. 1), जगदीश मोहुर्ले यांच्या घरासमोर (तलाव वार्ड), ग्रामपंचायत आवारात (वार्ड नं. 3), रस्से यांच्या घरासमोर (वार्ड नं. 3) व श्यामराव शेंडे यांच्या घराजवळ (वार्ड नं. 2) बोरवेलचे काम करण्यात आले.

अटल मध्यान्ह योजनेच्या माध्यमातून रोजगार हमी योजेनेवरील मजुरांना सकाळी व सायंकाळी वरण, भात व मटकीचे पौष्टिक अन्न पुरविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवातही फिस्कुटी येथे करण्यात आली आहे.

याकरिता फिस्कुटी ग्रामवासियांनी सरपंच नितीन गुरनुले व ग्रामपंचायत फिस्कृतीचे आभार मानले.
याप्रसंगी सरपंच नितीन गुरनुले, सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.