नगरसेवक दिपक जयस्वाल यांच्या कारचा अपघात

वरोरा तालुक्यातील टेंभुर्णी येथील घटना

वरोरा (प्रतिनिधी) : नागपूर वरून चंद्रपूरकडे येत असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक दिपक जयस्वाल हे टेंभुर्णी येथील पेट्रोल पंपाजवळून जात असताना  अचानक टिप्पर समोर आल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडक देत दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. सदर अपघात सोमवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास झाला.

चंद्रपूर महानगर पालीकेचे नगरसेकव दिपक जयस्वाल हे चारचाकी वाहन क्रं. एम एच 34 बी आर 6886 ने चंद्रपूरकडे येत असताना वरोरा तालुक्यताील टेंभुर्णी येथील पेटोल पंपाजवळ समोरून अचानक टीप्पर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीला धडक दिली यात मोठी हानी झाली नसली तरी दिपक जयस्वाल यांना किरकोळ मार लागला असून गाडी चालक उद्धव बन्सोड यांना डोक्याला दुखापत झाली आहे, दुचाकीस्वार रमेश चंद्रभान जेणेकर रा. पिचदुरा हे किरकोळ जखमी झाले आहे.

जखमींना उपचारांसाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात . आले. धडक एवढी जोरदार होती की चंद्रपूर दिशेने जाणाऱ्या कारने नागपूर मार्गावर वळण घेतली होती. त्यात जयस्वाल यांच्या गाडीचे मोठें नुकसान झाले आहे..