सर्पदंशाने बैलाचा मृत्यु, खुटाळा येथील शेतक-याला आर्थीक मदत

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम

अतुल कोल्हे भद्रावती :
बैल हा शेतक-याचा शेतीकामातील जोडीदार आहे. बैल नसेल तर सामान्य शेतक-याला शेती कसणे कठीण होवून जाते. अशातच जर शेतक-याचा बैल काही कारणाने मृत झाला तर शेतीकामे प्रभावित होतात. शेतकरी हतबल होतो. मात्र शेतक-याच्या सदैव पाठीशी राहणारी जिल्हा बँक शेतक-याच्या अस्मानी व सुल्तानी संकटात नेहमी धावून आली आहे. जिल्हा बँकेच्या ‘शेतकरी कल्याण नीधी’ योजनेअंतर्गत आजमितीला जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांना शेतीपुरक साहित्य व जनावरांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

तालुक्यातील खुटाळा या गावचे शेतकरी मोरेश्वर लक्ष्मण धांडे यांचा बैल नुकताच सर्पदंशाने मरण पावला. त्यांना शेतीकामात फार अडचण येवू लागली. याची दखल घेत, 28 जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चंदनखेडाच्या सौजन्याने बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत व डॉ. विजय देवतळे यांचे सहकार्याने व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष व विदयमान संचालक रवींद्र शिंदे यांचे हस्ते तालुक्यातील खुटाळा येथील शेतकरी मोरेश्वर लक्षण धांडे यांना बँकेचे ‘शेतकरी कल्याण नीधी’ योजनेअंतर्गत दहा हजार रुपये रोख रकमेची मदत करण्यात आली.

यावेळी भटाळी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष दादाराव ननावरे, ग्रामपंचायत नंदोरीचे उपसरपंच मंगेश भोयर, दौलत काकडे, सुधाकर रोहनकर, सुदाम चिडे, यशवंतराव गाटकीने आदी उपस्थित होते.
यावेळी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवींद्र शिंदे यांनी बँकेच्या विविध कल्याणकारी योजना असुन कास्तकारांनी व शेतमजुरांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

सोबतच ट्रस्ट तर्फे सुरु असलेल्या कामांची व योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या पालकांच्या, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व गरीब-गरजु कूटुंबातील पाल्यांच्या विवाहाचा खर्च ट्रस्ट करणार असुन त्याबाबतची नोंदणी अभियान सुरु झाले आहे. इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले. निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च ट्रस्ट उचलत आहे. तेव्हा गरजुंनी ट्रस्टच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रवि शिंदे यांनी यावेळी केले.