जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांची प्रमुख उपस्थिती
मूल (प्रतिनिधी): तालुक्यातील उश्राळा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 74 वी पुण्यतिथी गांधी विचारांचा जागर करीत साजरी करण्यात आली., यासोबतच ‘‘मन की बात’’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले उपस्थित होत्या.
गांधी विचार हा शांती, अहिंसा व सदभावनेचा विचार आहे. व्यक्ती संपली म्हणून असे अजोड विचार कधीच संपुष्टात येत नाहीत. म्हणून गांधी विचारांचा जागर सदैव होत राहील आणि गांधीजी आपल्यात सदैव जिवंत राहतील असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यंानी व्यक्त केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी उश्राळाचे सरपंच बंडू नर्मलवार, उपसरपंच तुषार ढोले, राजोलीचे भाजपा कार्यकर्ते चंदु नामपल्लीवर, ग्राम पंचायत सदस्य रत्नाकर कोटनाके, पपीता मेंढुलवार, ग्राम पंचायत सदस्य सुचिता मानकर, राहुल जिवतोडे, सीताराम म्हशाखेत्री, विश्वेश्वर नेवारे, गंगाधर मारबोनवार, इंद्रशा कटलाम, शंकर कन्नाके सुरेश नेवारे व नागरीक उपस्थित होते.