हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सध्या हवामान स्वच्छ असून तापमानात घट होऊन थंडी पडत आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याची चादर पसरली आहे. असे वातावरण 2 फेब्रुवारी पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त केली जात आहे. त्या नंतर 3 तारखे पासून ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट आणि विदर्भात थंडीचा जोर आहे. या भागात धुकं आणि थंडीचा प्रकोप जास्त आहे. येत्या 3 फेब्रुवारी नंतर राज्यात ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.