कोरोना नियम पाळत पिपर्डा ग्राम पंचायतने केले ध्वजारोहन
प्रमोद मेश्राम चिमूर : दरवर्षी भव्य स्वरूपात होणारा २६ जानेवारीचा गणराज्य दिन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणानेच साजरा करण्यात आला आहे.
गणराज्य दिन हा दरवर्षी उत्साहात साजरा होतो. प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. रेलचेल असते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच जाहीर कार्यक्रमांवर नियंत्रण आले आहे.पिपर्डा ग्राम पंचायत ने गणराज्य दिन सुद्धा साधेपणानेच साजरा केला आहे.
शाळा बंद असल्याने शाळेतही साधेपणाने साजरा केला आहे .शाळा व मुख्य समारंभ हा साधेपणाने व मोजक्या लोकांमध्येच पार पडला आहे या वेळी,सरपंच आकाश भेंडारे, सचिव येलमूलवार,उपसंरपंच चंदन चुणारकर, योगेश बोरकर तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रमोद बोरकर, प्रमोद मेश्राम, भीमराव चुणारकर पोलीस पाटील,भगवान कावळे, ईशवर रामटेके, धनराज गजभिये, सोनेकर माजी मुख्यद्द्यापक पिपर्डा, अरुण भेंडारे, दुष्ठत तागडे याची उपस्थित होते