रासायनीक खताला हद्दपार करून सेंद्रिय खताचा वापर करीत हजारो रूपयाचे घेतले उत्पन्न

जिल्हाधिकारी अजय गुन्हाणे यांनी दिली भेट
मारोडा येथील युवा शेतकऱ्याची युवा शेतकरी पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर

✍️ नुतन गोवर्धन, मूल
चंद्रपूर जिल्हयात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, अनेक शेतकऱ्याच्या हातात आलेले पिक अवकाळी पावसामुळे नैस्तानाबुत झाले, अशाही संकटातुन मार्ग काढत मारोडा येथील युवा शेतकरी प्रशांत बालाजी मेश्राम यांनी रासायनीक खताला हद्दपार करीत सेंद्रिय खताचा वापर करुन हजारो रूपयाचे दरवर्षी उत्पन्न घेत आहे. त्याच्या याधाळशी वृत्तीमुळे तो तालुक्यात प्रसिध्द आहे. नुकताच जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी मारोडा येथील प्रशांत मेश्राम यांच्या शेतीला भेट देत, शेतीची पाहणी केली व त्याचे कौतुक केले, युवा शेतकरी प्रशांत मेश्राम यांच्या नांवाचा प्रस्ताव राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कारासाठी शासनाने पाठविलेला आहे.

चंद्रपूर जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा म्हणुन प्रसिध्द आहे, मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर भात गिरण्या आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या पिकाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडलेला आहे, अशा संकटातुन मार्ग काळत अनेक शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामात चांगले उत्पन्न घेत आहेत, मूल तालुक्यातील मारोडा येथील सुशिक्षीत युवा शेतकरी प्रशांत मेश्राम यांनी मात्र चांगलीच झेप घेतली आहे. मेश्राम यांच्याकडे मारोडा शेतशिवारात 2.40 हेक्टर शेती आहे. या शेतात त्यांनी सेंद्रिय खताचा वापर करीत अनेक पिके घेत आहेत, त्यांच्या शेतात वांगे, टोमॅटो, कारली, वालीच्या शेंगा, मिरची बहरली आहे. दोन एकर जागेत खरबुजाची लागवड केली आहे, नगदी पिके असलेली करडई, हरभरा, तुर, मका अशीही पिके तो घेत आहे. सदर पिके घेण्यासाठी तो रासायनिक खताचा वापर न करता जिवामृत, अमृतवाणी, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क यांचा वापर करून तो विविध प्रकारचे उत्पन्न घेत आहे.

केवळ शेतपिकावरच अवलंबुन न राहता मेश्राम यांनी शेतीपुरक व्यवसाय उभे केले आहे, शेतात शेळीपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, पशुपालन व्यवसाय सुरू केलेले आहे. सदर पिकातुन त्याना बरीच मिळकत मिळत असल्याने बारा महिने शेतात विविध पिकांची लागवड करीत तो उत्पन्न घेत आहे. एकीकडे शेती भरवस्याची राहिली नाही अशी ओरड होत असताना प्रशांत मेश्राम यांनी घेतलेली झेप इतरांना प्रेरणादायक ठरली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्यासह जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बहाटे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, संवर्ग विकास अधिकारी सुनिल कारडवार, प्रभारी तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, मंगल कृषी अधिकारी शंतनु तिजारे, कृषी पर्यवेक्षक रविशंकर उईके उपस्थित होते.