नवजात बालकांना विकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफास

स्थानिक गुन्हे शाखेने घेतले 6 आरोपींना ताब्यात

चंद्रपूर (प्रतिनिधी) : एचआयव्ही झाल्याने बाळाचे तु बरोबर संगोपन करून शकत नाही, यामुळे तुझे बाळ एन जी ओ कडे पाठवु तिथे त्याची चांगली व्यवस्था होऊ शकते असे सांगुन मिना राजु चौधरी हिने सदर बाळाच्या आईकडून नवजात बाळ घेऊन गेली आणि नागपुरात विक्री केली. एन जी ओ कडे बाळाला पाठविले असतानाही मला पैसे कसे काय देत आहे यावरून संशय आल्याने सदर महिलेने मला बाळाची भेट करून दे अशी विनवनी केली मात्र बाळाची भेट करून दिलेले नाही, यामुळे अन्यायग्रस्त महिलने चंद्रपूरचे अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क करून रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली, तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तपासक्रम वेगाने फिरवीत 6 आरोपीना ताब्यात घेतले.

चंद्रपूर येथील शासकीय रूग्णालयात 13 जानेवारी रोजी पिडीत महिलेने एका गोडस बाळाला जन्म दिला, दरम्यान घराशेजारी राहणारी मिना राजु चौधरी हि महिला तिला भेटायला वारंवार जात होती, दोन दिवसांनी सुट्टी झाल्यावर पिडीत महिलेला मिना चौधरी यांनी स्वतःबरोबर घरी न नेता लोहारा येथील लोटस हॉटेल मध्ये घेऊन गेली, तु एच आय व्ही पिडीत  आहेस, आणि तु बाळाला जवळ ठेवली तर बाळाला सुध्दा एच आय व्ही होवु शकतो असे सांगुन बाळाला सुरक्षित ठेवायचे असल्यास नागपूर येथील आपल्या ओळखीच्या एन जी ओ कडे काही काळ सांभाळायला देण्यास सांगितले, यावरून पिडीत महिलने एड्सच्या भितीपोटी नागपूर वरून आलेल्या 3 महिलांच्या स्वाधिन बाळाला केली., दरम्यान 18 जानेवारी रोजी मिना चौधरी हिने पिडीत महिलेल्या घरी जावुन बाळ सांभाळण्याचे म्हणुन 49 हजार रूपये दिले, आपले बाळ सांभाळण्याचे आपल्यालाच पैसे कसे मिळतील अशी शंका आल्याने तिने बाळाला भेटायचे आहे असा तगादा लावला, मात्र मिना चौधरी हिने उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने बाळाची विक्री केल्याची शंका तिला आली, पिढीत महिलेने अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क करून रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली-

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदिप कापडे यानी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत मिना चौधरी हिला ताब्यात घेऊन तिची कसुन चौकशी केली असता, तिचा प्रियकर जाबिर रफिक शेख वय 32 वर्षे रा. बल्लारशा, उर्जुग सलीम सय्यद वय 43 रा. चंद्रपूर यांचे मदतीने नागपूर येथील वनिता कावडे, पुजा शाहु, शालीनी मोडक यांना 2 लाख 75 हजार रूपये किंमतीत विकल्याचे मान्य केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी नागपूर येथील वनिता कावडे, पुजा शाहु, शालीनी मोडक यांना ताब्यात घेत नवजात बाळाबाबत चौकशी केली असता चंद्रपूर येथील स्मिता मानकर या महिलेकडे सांभाळायला ठेवल्याचे सांगीतले, पोलीस पथकाने बाळाला ताब्यात घेत बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले असुन मिना चौधरी वय 34 वर्षे, रा. चंद्रपूर, जाबिर रफिक शेख वय 32 वर्षे रा. बल्लारशाा, अजुम सलीम सय्यद वय 43 वर्षे रा. चंद्रपूर, वनिता मुलचंद कावडे वय 39 वर्षे, पुजा सुरेंद्र शाहु वय 29 वर्षे, शालीनी गोपाल मोडक वय 39 वर्षे रा. नागपूर यांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सदर प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक जितेद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक संदिप कापडे, संजय आतकुलवार, अमोल धंदरे, संतोष येलपुरवार, कुंदनसिंग बावरी, रविंद्र पंधरे, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, प्राजल झिलपे, महीला पोलीस अपर्णा मानकर, निराशा तितरे यांनी केली.