वर्षा भांडारकर बनल्या शहर स्वच्छता अभियान ‘बॅ़न्ड अम्बेसिडर’

मूल नगरपरिषद स्वच्छता अभियान

मूल (प्रतिनिधी) :- पयॉवरण प़ेमी व नवभारत विद्यालय मूल च्या शिक्षीका सौ. वषॉ भांडारकर यांची “मूल नगरपरिषद स्वच्छता अभियान..२०२२” करीता बॅ़ड अम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

मूल नगर पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सवंसाधारण सभेत तसा ठराव पारित करून सवॉनुमते वर्षा भांडारकर यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.तसे नियुक्तीपत्र मूल नगर पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी बहाल केले आहे.

संपुर्ण जिल्हयात पर्यावरण व वुक्षप़ेमी म्हणून सौ. भांडारवार यांची ख्याती आहे.वुक्षवल्ली संगोपणासाठी आपला संपुर्ण वेळ घालविताना विद्यार्थ्याना पयॉवरणाचे अनन्यसाधारण महत्त्व प़त्यक्ष आचरणातून समजावणे, परिसरातील जनतेमध्ये जनजागृती करण्याकरीता सौ.भांडारकर सतत प्रयत्नरत असतात.

नगरपरिषद मूल अंतगंत स्च्छता अभियान मोहीम मोठया स्तरावर राबविण्यात येते.सौ. भांडारकर यांची
ब़न्ड अम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आल्याने मूल शहरात स्वच्छता अभियान मोहीम भरधाव
राहील अशी अपेक्षा सवं स्तरातून व्यक्त होत असून सौ.भांडारकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.