पोंभुर्णा नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा

कॉंग्रेसला केवळ एका जागेवर मानावे लागले समाधान

पोंभुर्णा (प्रतिनिधी) : पोंभुर्णा नगर पंचायतच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाने 10 जागेवर विजय प्राप्त करून नगर पंचायतवर भाजपाचा झेंडा उभा केला, तर कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार येवुनही केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले, शिवसेना 4 तर वंचित बहुजन आघाडीचे 2 उमेदवार निवडुन आले आहे.

नगर पंचायतच्या निवडणुकीत प्रभाग क्रं. एक मधुन बालाजी कामसेन मेश्राम (शिवसेना) प्रभाग क्र. 2 मधुन आकाशी सुगत गेडाम (भाजपा), प्रभाग क्र .३ मधुन माजी नगराध्यक्ष श्वेता महेंद्र वनकर (भाजपा) प्रभाग क्र.४ मधुन सुलभाताई गुरुदास पिपरे (भाजपा), प्रभाग क्र.५ मधुन अतुल विश्वनाथ वाकडे (वंचित) प्रभाग क्र.६ मधुन रीना पवन उराडे (वंचित) प्रभाग क्र.७ मधुन आशिष विलास कावटवार (शिवसेना) प्रभाग क्र 8 मधुन नंदाताई ऋषी कोटरंगे (भाजपा), प्रभाग क्र .9 मधुन शारदा प्रशांत गुरनुले (भाजपा), प्रभाग क्र.१० मधुन लक्ष्मण उद्धव कोडापे (भाजपा), प्रभाग क्र.११ मधुन नंदू बुरांडे (काँग्रेस)  प्रभाग क्र.१२ मधुन रोहिणी रुपेश ढोले (भाजपा), प्रभाग क्र.१३ मधुन अजित अरुणराव मंगळगिरीवार (भाजपा), प्रभाग क्र.१४ मधुन अभिषेक कैलास बद्दलवार (शिवसेना) प्रभाग क्र.१५ मधुन उषा सदाशिव गोरंतवार (भाजपा), प्रभाग क्र.१६ मधुन रामेश्वरी गणेश वासलवार (शिवसेना), प्रभाग क्र.१७ मधुन दर्शन गजानन गोरंटिवर (भाजपा) विजयी झालेले आहे

पोंभुर्णा नगर पंचायतच्या प्रभाग क्रं. 7 मध्ये धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशी लढत होती, हि लढत भाजपा आणि शिवसेनेचेसाठी अतिशय महत्वाची मानली जात होती, मात्र मतदारानी याठिकाणी जनशक्तीवर बोट ठेवुन शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आशिष कावटवार यांना विजयी केले.