‘आकाश’भरारी घेणाऱ्या त्या गुरूजीच्या बातमीची शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतली दखल

भ्रमणध्वनीवरून मागीतली माहिती : कारवाईचे दिले संकेत

मूल (प्रतिनिधी) : कोरोना काळात शाळा बंद असल्याचा फायदा घेत काही शिक्षक नेटवर्क मार्केटिंगच्या व्यवसायात चांगलेच गुंतुन लाखो रूपयाची माया गोळा करीत शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष करणाऱ्या व नेटवर्क मार्केंटिंग मध्ये आकाशभरारी घेणाऱ्या त्या नेटवर्क मार्केटिंगच्या मास्टरमाईड गुरूची आता संपुर्ण माहिती राज्याचे शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चु कडु यांनी मागीतली आहे. यामुळे मूल तालुक्यात शासकीय सेवेत राहुन त्याकडे दुर्लक्ष करीत नेटवर्क मार्केटिंग करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

18 डिसेंबर आणि 15 जानेवारी रोजी दे धक्का एक्सप्रेस मध्ये  नेटवर्क मार्केटिंगच्या व्यवसायात ‘आकाश’भरारी घेणाऱ्या त्या मास्टरमांर्डड गुरूजीबद्दल वृत्त प्रकाशित केले होते, यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असताना याविषयांवर सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली होती, अनेक जण ‘त्या’ शिक्षकाबद्दल रोष व्यक्त केला.सदर शिक्षकांमुळे प्रामाणिक शिक्षकांना मनस्तापही सहन करावा लागला. नेटवर्क मार्केटिंगच्या व्यवसायात विदेशवारी करीत ‘आकाश’भरारी घेणाऱ्या ‘त्या’ मास्टर गुरूला काही दिवसांपुर्वी विलगीकरणात राहावे लागल्याची चर्चा आहे. मात्र गुरूजीचा व्यवसाय संथ होण्यापेक्षा वाढतच चाललेला आहे, दरम्यान याबाबत राज्याचे शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चु कडु यानी सदर बातमी वाचुन दे धक्का एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक मंगेश पोटवार यांना माहिती विचारली आणि ‘त्या’ शिक्षकाची संपुर्ण माहिती तात्काळ पाठविण्यास सांगीतले.

नेटवर्क मार्केटिंग करणारा ‘तो’ शिक्षक या व्यवसायात खंड पडु नये म्हणुन शाळेच्या मुख्यलयातही राहात नाही, मूल येथुन शाळेच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकाची संपुर्ण कुंडलीच आता शिक्षण राज्यमंत्र्यापुढे मांडण्याची तयारी दे धक्काच्या माध्यमातुन करण्यात आली आहे.