कोरोना योध्दा डॉ. सचिन धगडी यांचा सत्कार
जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रमाता कुणबी महिला महासंघ बचत गट व मातोश्री क्लिनीकचा उपक्रम
मूल (प्रतिनिधी): कोरोना संक्रमण सारख्या संकटाला समोर जाण्यासाठी स्थानिक जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रमाता कुणबी महिला महसंघ बचत गट आणि मातोश्री क्लिनीकच्या वतिने येथील तालुका क्रिडा संकुल मध्ये जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली, यावेळी नागरीकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटन मूल नगर पालीकेच्या माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी चंद्रपूर येथील हृदयरोग, मधुमेह व किडनी रोग तज्ञ डॉ. सचिन धगडी, गुप्तरोग, त्वचारोग, सौंदर्य तज्ञ डॉ गिरीश बोबडे, स्त्रिरोग तज्ञ डॉ शुभांगी वासाडे, दंतरोग तज्ञ डॉ रोहिणी बोबडे, नाक, कान, घसा तज्ञ डॉ आशीष पोडे, स्त्रिरोग व सौदर्य तज्ञ डॉ प्रविणा वऱ्हाडे, होमिओपॅथी कसल्टन तथा फिजीशियन डॉ अमेय झरकर, डॉ. सत्यजित पोद्दार, लोकमत सखी मंचच्या अध्यक्ष जयश्री चन्नुरवार, , जिजाऊ ब्रिगेड तथा राष्ट्रमाता कुणबी महासंघ महिला बचत गटाच्या अध्यक्ष संजीवनी योगेन्द्र वाघरे, उपाध्यक्ष कल्पना नरूले, सचीव किरन चौधरी, माजी सभापती तथा नगरसेवक प्रशांत लाडवे, राजश्री मुस्तीलवार आदी उपस्थित होते.
यावेळी कोरोना काळात कोरोना रूग्णांना जिवन जगण्याचे बळ देत, रूग्णांना बरे करणारे चंद्रपूर येथील हृदयरोग, मधुमेह व किडनी रोग तज्ञ डॉ. सचिन धगडी यांचा सत्कार करण्यात आला.. उपस्थित तज्ञ डॉक्टरांनी महिलां व पुरूषांची आरोग्य तपासणी केली, व रुग्णाची हिमोग्लोबिन, शुगर, सिकलसेल चाचणी करण्यात आली.
.कार्यक्रर्माचे संचालन हिना सुरकर, सोनु मस्के यांनी केले तर उपस्थितांचे आभार पपीता झरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी .भावना चौखूंडे, विद्या बोबाटे, कल्पना पोलोजवार, कल्पना मेश्राम, सारीका वासेकर, शशीकला मांडवकर, साधना रडके, किर्ती बांगरे, बबीता कांबळी, .सुधा चरडुके,, श्वेता शेरकी, सुषमा धोटे,,. टिना ठाकरे,. मनीषा लाडवे यांनी अथक परिश्रम घेतले