खेडी-गोंडपिपरी रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा
मूल (प्रतिनिधी) : गेल्या 3 वर्षापासुन सुरू असलेल्या खेडी गोंडपिपरी रस्त्याचे काम अजुनही पुर्ण झालेले नाही यामुळे यारस्त्यावर अपघात होवून अनेक निरअपराध व्यक्तींचे जिव गेलेले आहे, रस्ता अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियाना आर्थिक मदत करावी व कामात दिरंगाई करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नांदगावच्या सरपंच हिमानी वाकुडकर यांनी मूल येथील विश्राम गृहात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
खेडी-गोंडपिपरी-कोळसा रस्त्याच्या रूंदीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी सुमारे 218 कोठी रूपयाची निवीदा काढण्यात आली होती, सदर काम हैदाबाद येथील एस आर के कंपनीला मंजुर करण्यात आले होते. सदर कंपनीने कोळसा रोडवेज प्रा. लिमीटेड कंपनीला काम करण्यासाठी नेमणुक केली., मात्र सदर कंपनीने मागील 3 वर्षापासुन अतिशय धिम्मा गतीने रस्त्याचे काम सुरू केले आहे, 2 वर्षात सदर काम पुर्ण करण्यासाठी कंपनी सोबत करारनामा करण्यात आलेला होता, मात्र तिन वर्षाचा कालावधी लोटुन गेला परंतु सदर रस्त्याचे 25 टक्केही काम पुर्ण झालेले नाही, संपुर्ण रस्त्याच्या काही अंतरावर सुमारे 116 सिडी वर्कचे काम घेण्यात आलेले आहे, यामुळे कंपनीने काही ठिकाणी खोदकाम करून ठेवलेले आहे. यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरू असल्यामुळे अनेकांना आपले जिव गमवावे लागले तर काही जखमी झालेले आहे, मात्र मुजोर कंपनी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अजुनही जाग आलेली नाही. यामुळे आम्हाला न्यायालयाचा मार्ग स्विकारावा लागत असल्याची खंत हिमानी वाकुडकर यांनी यावेळी व्यक्त केली.
सदर रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करून असा इशारा हिमानी वाकुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पत्रकार परिषदेला बोंडाळा खुर्दचे सरपंच जालिंदर बांगरे, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, जुनासुर्ला ग्राम पंचायतचे सदस्य गणेश खोब्रागडे, नवेगांव भुजलाचे माजी सरपंच सुमित आरेकर, बोंडाळा खुर्दचे माजी सरपंच योगेश शेरकी उपस्थित होते.
रस्ता अपघातात गेला चार व्यक्तीचा जीव खेडी-गोंडपिपरी या रस्त्याचे काम कंपनीमार्फत अतिशय धिम्या गतीने सुरू आहे, याच रस्त्यावर करंजी येथील पवन चापले, कोसंबी येथील गयाराम चौधरी, नवेगांव भुज येथील पंकज तिवाडे आणि कॉंग्रेसचे नेते संजय पाटील मारकवार हे अपघातात ठार झालेे. तर दररोज किरकोळ अपघात होत असल्याच्या घटना घडत आहे.