चिरोली कवळपेठ रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करा : वर्षा लोनबले

नागरीकांना नाहक त्रास

गौरव शामकुळे, मूल                                                 गेल्या 3 वर्षापुर्वी खडीकरण करून ठेवलेल्या कवळपेठ-चिरोली हेटी या रस्त्यावरून ये-जा करणाÚया नागरीकांची संख्या मोठी आहे, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षीपणामुळे सदर रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलेले नाही यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी मूल पंचायत समितीच्या सदस्या वर्षा लोनबले यांनी प्रशासनाकडे केली आहे.

मूल तालुक्यतील मौजा चिरोली येथे कवळपेठ येथील शाळकरी मुळे मोठया प्रमाणावर येत असतात, सोबतच यामार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहन चालकही गाव जवळ असल्यामुळे याच मार्गावरून मार्गक्रमण करीत असतात, सदर रस्तावर मोठया प्रमाणावर जंगल असुन वन्यप्राण्यांचा मोठया प्रमाणावर वावर आहे. यापरिसरात अनेक शेतकÚयांच्या शेती असुन त्यांना रब्बी पिके घेण्यासाठी यामार्गाचा वापर करूनच जावे लागते सदर मार्गावरून रोज हजारो नागरीक ये-जा करीत असतात परंतु खड्डीकरण केलेल्या रस्त्यावर अनेक दिवसांपासुन डांबरीकरण करण्यात आलेले नाही यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वन्यजिवाच्या भितीमुळे अनेक वाहनधानक यामार्गावरून प्रवास करण्यास टाळत असतात, कवळपेठ येथे अनेकदा वाघाचे हल्ले झाले, अनेकांना आपला जिव गमवावा लागला, यामुळे सदर रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करावे अशी मागणी मूल पंचायत समितीच्या सदस्या वर्षा लोनबले यांनी केली आहे.