विवेकानंद महाविद्यालयात विवेकानंद जयंती साजरी

अतुल कोल्हे भद्रावती :
विवेकानंद जयंती निमित्त स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात “विवेकानंदांचे विचार दर्शन “या विषयावर आभासी पध्दतीने राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपसभापती मा.मोरेश्वर टेमूर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या वेबिनारमध्ये डॉ. सुदर्शन दिवसे (कोरपना) हे प्रमुख व्याख्याता म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री अरविंद स्तवनाने आणि त्यानंतर विद्यापीठ गीताने झाली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी आपल्या प्रास्ताविकात आजच्या युवा पिढीने आपले ध्येय समोर ठेवावे आणि ध्येयापर्यंत जाण्यासाठी कठोर मेहनत करावी असा संदेश दिला. विवेकानंद यांचे विचार दर्शन या विषयावर बोलताना डॉ. दिवसे यांनी विवेकानंद यांचे विचार हे प्रासंगिक असून त्यांचा नेमका अर्थ लावणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रा धनराज अस्वले, सेवानिवृत्त प्राध्यापक (बेहरीन) यांनी मनोगत व्यक्त करताना विवेकानंद हे जगाला दिशा दाखवणारे महान तत्त्वज्ञानी आहेत असे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून एड. टेमुर्डे यांनी वेबिनारच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी आभासी पद्धतीने मोठ्या संख्येने प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.