1 महिला जागीच ठार
गौरव शामकुळे, मूल
ओरिसा वरून करीमनगर येथे कामानिमीत्य चारचाकी वाहनाने जात असताना आकापूर जवळील वळणावर चारचाकी वाहन पलटल्याने 1 महीला जागीच ठार झाली तर 11 जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 4 वाजता दरम्यान घडली. पुतना जगपत्ती धरआ वय 40 वर्षे रा. दरलीपाळा त. कोमना जि. नव्वापाळा ओरिसा असे मृतक महिलेचे नाव आहे तर जयप्रकाश सुरेशचंद्र गहीर रा. तरबोळ असे चालकाचे नाव आहे.
मागील 2 वर्षांपासून चंद्रपूर- गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे, मूल तालुक्यातील आकापूर जवळील काम काही दिवसापुर्वी पुर्ण झाले मात्र वळणावर रिप्लेक्टर लावणे आवश्यक होते परंतु त्याठिकाणी रिप्लेक्टर लावण्यात आलेले नसल्याने रस्ता माहित नसलेल्या चालकांना रात्रोच्या वेळेस वळण असल्याचे दिसुन येत नाही. यामुळेच ओरिसावरून करीमनगर येथे चारचाकी वाहन क्रं. ओ डी 03 एम 3197 ने कामावर जाण्यासाठी निघालेल्या कामगाराचे वाहन पटली खाल्याने त्यात ओडीसा येथील पुतना जगपत्ती धरआ वय 40 वर्षे रा. दरलीपाळा त. कोमना जि. नव्वापाळा ही महिला वाहनाखाली दबुन जागीच ठार झाली. तर 2 जण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर चंद्रपूर येथे तर 9 जण किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
वाहनाखाली दबुलेल्या महिलेला मूल पोलीस व नागरीकांच्या प्रयत्नातुन काढण्यात आले असुन पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.