गुरुवारी 1 कोरोनामुक्त, 41 बाधित
मूल तालुक्यात कोरोनाचा शिरकाव
चंद्रपूर (प्रतिनिधी) : चालू आठवड्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या शंभरावर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 41 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी मृत्यू संख्या शून्य आहे.
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 29, बल्लारपूर 4, चंद्रपूर 2, भद्रावती 2, मुल 1, राजुरा 1 तर कोरपना येथे 2 रुग्ण आढळून आले असून, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, वरोरा, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 985 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 340 झाली आहे. सध्या 100 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 4 हजार 817 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 14 हजार 511 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.