जिल्हात सक्रिय रुग्ण संख्या 60
चंद्रपूर : दि. 5 जानेवारी गत 24 तासात जिल्ह्यात 31 जण नव्याने बाधित आले आहेत. तर बुधवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाचित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 24, बल्लारपुर 2, राजुरा 2. चंद्रपूर 1 भद्रावती । तर चिमूर येथे रुग्ण आढळून आले असून ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही मुल सावली, पण गोंडपिपरी, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुणांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्या मध्ये चंद्रपूर येथील एका महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 944 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 339 झाली आहे. सध्या 60 बाधितावर उपचार सुरू आहेत आतापर्यंत लाख 3 हजार 406 रुग्णाची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 13 हजार 50 नमुने निगेटीव्ह आते आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधिताये मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखावे यात्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वतःची काळजी घ्यावी उसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आव्हान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे,