45 गर्भवती महिलांची पुर्व नियोजीत प्रसुती शस्त्रक्रिया
मूल (प्रतिनिधी) : लोकसंख्या नियंत्रणासोबतच परिवार नियोजन ही संकल्पना राज्यात राबवित येत आहे, त्यादृष्टीकोनातुन मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात मागील 9 महिण्यात 169 महिला तर 13 पुरूषांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासोबतच 45 गर्भवती महिलांची पुर्व नियोजीत प्रसुत्री शस्त्रक्रियाही याठिकाणी करण्यात आली. यामुळे शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या कुटुंबियाचे आर्थीक व मानसिक त्रास कमी होत आहे.
छोटा परिवार सुखी परिवार अशी घोषणा देत राज्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम लागु करण्यात आला. त्यामागे लोकसंख्या नियत्रणासोबतच परिवार नियोजन ही संकल्पना होती. स्त्री व पुरूष या दोघांच्या ही शस्त्रक्रिया करण्यात येतो मात्र स्त्रियांच्या तुलनेत पुरूषांच्या शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण कमी आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाया रूग्णांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात दर आठवडयाच्या सोमवारी भरती करण्यात येतोे आणि मंगळवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते. गेल्या 9 महिण्यात 169 महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आले आहे तर 13 पुरूषांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पुर्व नियोजित प्रसुती शस्त्रक्रिया मागील 9 महिण्यापासुन करण्यात येत आहे. उपजिल्हा रूग्णालय मूलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उज्वलकुमार इंदुरकर आणि येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. मनिषा रेवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात 45 गर्भवती महिलांची पुर्व नियोजीत प्रसुती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मागील महिण्यापासुन येथील उपजिल्हा रूग्णालयात अंडवृध्दी शस्त्रक्रिया करण्यात येत असुन अनेक रूग्णांवर याठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. यामुळे जिल्हयाच्या ठिकाणी जावुन शस्त्रक्रिया करण्याचा वेळ आणि त्रास कमी झाल्याचे शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांनी दे धक्का एक्सप्रेसशी बोलताना सांगीतले.