चिरोली ग्राम पंचायतच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार धिरज वाळके विजयी

चिरोली ग्राम पंचायत सदस्यपदासाठी झाली पोटनिवडणुक
मूल : तालुक्यातील चिरोली ग्राम पंचायतचे सदस्य बंडु वाकडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 21 डिसेंबर रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली आणि बुधवारी मूल येथील प्रशासकीय भवनात मतमोजणी पार पडली. यामध्ये अपक्ष उमेदवार धिरज वाळके हे सर्वाधिक मते घेत विजयी झाले.
मुल तालुक्यातील चिरोली ग्राम पंचायतची निवडणुक मागील वर्षी पार पडली, सदर निवडणुकीत वार्ड क्रं. 3 मधुन सर्वसाधारण प्रवर्गातुन बंडु वाकडे हे विजयी झाले होते, मात्र काही महिण्यापुर्वी त्यांचे निधन झाल्याने, रिक्त झालेल्या जागेसाठी 21 डिसेंबर रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली, सदर निवडणुकीत अतुल लेनगुरे, निमोन शेंडे धीरज वाळके, प्रशांत रामटेके, मनोज लेनगुरे, कविता सुरमवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, बुधवारी मूल येथील प्रशासकीय भवनामध्ये मतमोजणी झाली यामध्ये अपक्ष उमेदवार धीरज वाळके 168, अतुल लेनगुरे 158,  प्रशांत रामटेके 45, मनोज लेणगुरे 43 मते मिळाले. तर चिरोली ग्राम पंचायतच्या पोटनिवडणुकीत माजी उपसरपंच कविता सुरमवार यांना केवळ 20 मतावर समाधान मानावे लागले,  माजी उपसरपंच अनिल शेंडे यांचे चिरंजीव निमोन शेंडे हे 58 मते घेवून तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. यामुळे सदर पोटनिवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना चांगलीस चपराक बसली.