ऐण निवडणुकीत झालेल्या कार्यवाहीने भाजपा अडचणीत
गोंडपिपरी : ऐण निवडणुकीचा धामधूमीत भाजपाच्या पंचायत समितीचा सभापतीचे नवरोबा रेती तस्कर निघाल्याने गोंडपिपरी भाजपा अडचणीत आले. रेती तस्करी करीत असतांना महसूल विभागाने केलेल्या कार्यवाहीत गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापती सूनिता येग्गेवार यांचे पती भानेश येग्गेवार यांच्या मालकीची ट्रक्टर सापडली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
गोंडपिपरी तालुक्यात रेती तस्करांनी धुमाकुळ घातला आहे. रेती, मुरूमाची चोरी सूरू असतांना महसूल विभागाने डोळे झाकले आहेत. अश्यात आज पानोरा व राळापेठ नदीपात्रातून रेतीची तस्करी करणारे दोन ट्रक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले. यातील एक ट्रक्टर गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापतीचे नवरोबा भानेश येग्गेवार यांच्या मालकीची होती. ऐण निवडणुकीचा धामधुमीत भाजपाचा सभापतीचे नवरोबा रेती तस्कर निघाल्याने भाजपाच्या अडचणीत वाढ झाली. विरोधकांनी हा मुद्दा प्रचारात घेतल्याने भाजपा तोंडघशी पडली आहे.