मंगेश पोटवार, मूल
महिलांना रोजगारातुन आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतुन भरमसाठ अनुदान देवून 10 शेळया व 1 बोकळ लाभार्थ्यांना आणुन देण्यात आले होते, सदर योजनेच्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर आणि मार्च महिण्यात शेळयाचे वाटपही करण्यात आले मात्र यातील अनेक लाभार्थ्यांनी शेळया विकल्याचे समोर आले आहे, सदर लाभार्थ्यामध्ये पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकासह काही कर्मचाÚयांच्या पत्नीचाही या योजनेतील लाभार्थ्यांमध्ये सहभाग आहे हे विशेष.
सिंधुदुर्ग जिल्हयाच्या धर्तीवर राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतिने महिलांना स्वयंरोजागर देण्याच्या दृष्टीने चांदा ते बांदा विकास योजनेंतर्गत 10 शेळया आणि 1 बोकड असा शेळी गट वाटप करण्याची योजना आहे, यायोजनेतील खुला प्रवर्गातील लाभार्थीनीना 75 टक्के तर अनुसुचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना 90 टक्के पर्यंत शासनाकडून अनुदान दिल्या जाते, मूल तालुक्यातील गडीसुर्ला, जुनासुर्ला, बेलघाटा, मुरमाडी, चिरोली, भगवानपूर आणि जानाळा या 7 गावातील सुमारे 78 लाभार्थ्यांनी यायोजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना डिसेंबर 2019 आणि मार्च 2020 मध्ये शेळी आणि बोकड वाटपही करण्यात आलेले आहे, त्याशेळयांचा 3 वर्षाचा विमा सुध्दा काढण्यात आलेला आहे. शासनाने ठरवुन दिलेल्या दिशादर्शक नियमानुसार लाभार्थ्यांना यायोजनेचा लाभ न देता सरळसरळ लाभ देण्यात आलेला आहे, अनेक लाभार्थ्यांना शेळी पालन व्यवस्थापन व चारा उत्पादन विषयक प्रशिक्षण घेणे आवश्यक होते, परंतु यातिल अनेक लाभार्थी अप्रशिक्षीत आहेत, यामुळे शेळयांचे संगोपन कशा पध्दतीने करतील याचा थोडाही विचार वाटप करणाÚया अधिकाÚयांनी केला कि नाही किंवा अर्थपुर्ण संबधातुन याशेळयाचे वाटप झाले असा सवाल आता गावागावातुन ऐकाला मिळत आहे.
सदर योजनेचा लाभ घेणाÚया लाभार्थ्याकडून किमान 3 वर्षे शेळयांचे संगोपन करण्याबाबत बंधपत्र लिहून घेणे आवष्यक होते, सदर बंधपत्राच्या भितीने शेळयाची विक्री करणार नाही परंतु यायोजनेतील काही लाभार्थी शेळयांचे संगोपन करण्याचे सोडून योजनेतील शेळया विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे, याप्रकरणाची चौकशी केल्यास अधिकाÚयांसह लाभार्थीही संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यात 78 लाभार्थ्यांना 847 शेळया आणि बोकड वाटप करण्यात आलेले आहे, सदर शेळया बोकड हे अमरावती, जोळमोहा यवतमाळ, लाखांदुर येथून आणण्यात आलेले असून काही शेळया विविध आजारेने मृत्युमुखी पडल्या, परंतु उर्वरीत शेळया गेल्या कुठे असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित झाला आहे. शेळयांच्या आयात प्रकरणात काही अधिकाÚयांचे अर्थपुर्ण व्यवहार केला असल्याचेही बोलल्या जात असून सदर प्रकरणात मोठया प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचाही आरोप दबक्या आवाजात सुरू आहे. सदर योजनेची तात्काळ चौकशी करून दोषीं लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
Home Breaking News शेळीगट वाटपातील शेळया गायब, लाभार्थ्यांमध्ये पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकासह कर्मचा-यांच्या पत्नींचाही समावेश