🖋️नुतन गोवर्धन, मूल
डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गायमुख येथील देवस्थानात अतिशय प्राचीण अशी शिवलींगाची मुर्ती आहे, याठिकाणी दुरदुरून मोठया श्रध्देने भाविक दर्शनासाठी येतात, याठिकाणचा झरा बारमाही वाहत असते, त्यामुळे याझÚयाकडे भाविकचे आपसुकच लक्ष जाते. करोडो रूपये खर्च करून विकासकामे केली जात आहे, याची देखभाल सयुक्त वनव्यवस्थापन समिती करीत आहे, यास्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
उथळपेठ ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गायमुख येथे महाशिवरात्री ला मोठी यात्रा भरते, 3 दिवस भरणाÚया यात्रेत परिसरातील नागरीकांसह चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयातील भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी येत असतात. याठिकाणी असलेल्या कुंड नादुस्त असल्याने काही दिवसापुर्वी दुरूस्ती करण्यात आले, परिसरातील सुमारे 7 एकर जागेमध्ये वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातुन फळझाडे लावण्यात आलेले आहे, भाविक गायमुख या पर्यटन स्थळाचे दर्शन घेण्यासाठी नेहमीच येत असतात. वनविभाग आणि माजी पालकमंत्री तथा क्षेत्राचे सुधीर मुनगंटीवार यांनी याठिकाणी करोडो रूपयांची निधी सौदर्यीकरणासाठी उपलब्ध करून दिले आहे.
उथळपेठ येथील गायमुख देवस्थानासमोरील पाण्याच्या कुंडाचे सौदर्यीकरण करण्यात आलेले आहे, यासोबत गाय, बैल आदी प्राण्यांच्या तसेच गुराखी यांच्या प्रतिमा, विविध प्रजातींची लावण्यात आलेली रोपे, मुलांसाठी तयार करण्यात आलेले पार्क आदींच्या माध्यमातून हा परिसर अधिक देखणा करण्यात आलेला आहे. गावकरी समितीच्या पाठीशी उभे राहिल्याने चराई, वनवणवा, वृक्षतोड व वन्यप्राणी शिकारीला आळा बसला. पूरातन काळातील गायमूख हेमाडपंथीय शिव मंदिरालगत नैसर्गिक बारमाही वाहणारा झरा आहे. या झÚयाच्या परिसरात श्रमदानातून रोपवनची कामे झाली. ही रोपे आता जोमाने वाढली असून परिसर हिरवाकंच झाला आहे.
पर्यटन विकासाचा संकल्प
महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास योजनेअंतर्गत गायमुख क्षेत्राच्या विकासाकरिता वनविभागाद्वारे कौशल्य विकास केंद्र, झाडांचे सभोवताल ओटे तयार करण्यात आले. खेळणी साहित्य खरेदी केली. चेनलिंक कुंपण, निरीक्षण मनोरा, नैसर्गिक पायवाट, कुंडाची दुरुस्ती व नाली बांधकाम आदी कामे झाली आहेत. या क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.