अवकाळी पाऊसाने शेतीचे मोठे नुकसान

 

मूल: तालुक्यातील टेकाडी परिसरात आणि काही ठिकाणी मोठया प्रमाणावर अवकाळी पाऊस आल्याने मोठया प्रमाणावर शेतकÚयांचे नुकसान झालेले आहे. शेतातचे सव्र्हे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते मंगेश पोटवार यांनी मूलचे उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली.
मूल तालुक्यातील टेकाडी, चिमढा, कुकुडचिमढा, आकापूर आणि मरेगांव परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास सुमारे 2 तास अवकाळी पाऊस बरसला, सदर पावसामुळे शेतात कापुन ठेवलेल्या धानाच्या संपुर्ण सरडया पाण्याखाली आहेत, उभे असलेल्या पिकामध्येही मोठया प्रमाणावर पाणी जमा होवून आहे. धान बांधुन ठेवले त्यामध्येही पाणी जमा होवून आहे. याअवकाळी पावसामुळे पÚहाटी, भाजीपाला आणि इतरही पिकांचा मोठया प्रमाणावर नुकसान झालेला असल्याचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शेतकÚयांनी म्हटले आहे.
वर्षेभराची पुंजी तयार करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात दिवसरात्र मेहनत घेवून धान व इतर पिकाचे उत्पन्न घेत असतो, केवळ शेतीच्या आधारावर अनेक शेतकरी आपले जिवन जगत असताना, रविवारीच्या सायंकाळी आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने, संपुर्ण हंगामामध्ये शेतकरी शेतात राबराब राबुन हाती आलेल्या उत्पन्नावर अवकाळी पाऊस बसरल्याने संपुर्ण पिक वाया गेलेले आहे, यावेळी शेतकरी नेते मंगेश पोटवार, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, टेकाडीचे सरपंच सतिश चैधरी, उपसरपंच शंकर सिडाम, सामाजिक कार्यकर्ते गौरव शामकुळे, धनराज रामटेके, प्रशांत गटटुवार, उथळपेठचे सरपंच पलींद्र सातपुते, किसन गुरूनुले, मारोती शेंडे, राहुल आगडे आदी उपस्थित होते.